विटवा येथे १जानेवारी शौर्य दिनानिमित्त शूरवीर सैनिकांना मानवंदना

bhima-koregaon-shurya-diwas

खिर्डी (प्रतिनिधी विनायक जहुरे) – विटवा ता.रावेर येथे १ जानेवारी शुक्रवार रोजी भीमा कोरेगाव शौर्यदिना निमित्त न्यू संघर्ष तरुण मित्र मंडळ व बौद्ध पंच मंडळातर्फे भीमा कोरगाव येथे शहीद झालेल्या शुरविर सैनिकांना मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात ही सर्व प्रथम गावातील लहान मुले व विद्यार्थ्यांमार्फ़त सामूहिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले नंतर प्रतिकात्मक डिजिटल बॅनर तयार केलेल्या क्रांती स्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले त्यानंतर आयु. साहेबराव वानखेड़े यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त लढाई कशासाठी या विषयावर मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, लढाया भरपूर झाल्या पण भीमा कोरेगावची लढाई ही आत्मसन्मानची लढाई होती ज्या पेशवाईने इथल्या बहुजनांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मानसिक ग़ुलाम बनवून शोषण केले त्या पेशवाइचा अंत शूरवीर महार बटालियनच्या 500 महार सैनिकांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा २८ हजार सैन्याचा पराभव केला असे सांगत सखोल मार्गदर्शन केले.

यानंतर नरेंद्र वानखेड़े यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करण मनुरे यांनी तर आभार रवि अढागळे यांनी केले यावेळी गावातील नागरिक कडु तायड़े, राजू वानखेड़े, पोलीस पाटील बाळु पवार मकुंदा गणेश, किरण गोमटे ब्रिजलाल अढागळे लखन वानखेड़े, संजय वानखेड़े धीरज पानपाटील, प्रदीप अड़कमोल, समाधान मनुरे अंकुश मनुरे कुणाल अढागळे व गावातील विद्यार्थी,विद्यार्थिनी तरुण,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here