बीसीसीआय अध्यक्ष क्रिकेटपटू सौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका

saurav-ganguly

दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचेही समजत आहे.

सौरव गांगुली याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सौरव गांगुलीच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आज सकाळीच गांगुलीला छातीत दुखत असल्यामुळे आणि चक्कर येत असल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुलीवर उपचार सुरू आहेत. गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा झटका आला. रुग्णायलायत त्याचं ईसीजी, ईसीओ आणि कार्डिओ करण्यात आलं. यानंतर आता त्याचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्यात येणार आहे. सौरव गांगुली याच्यावर आज संध्याकाळी एन्जियोप्लास्टी करण्यात येणार असल्याचीही शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here