गॅस गिझर फुटल्याने युवकाचा मृत्यू

dead

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – दौलत नगर येथील एका घरात बाथरूम मधील गॅस गिझर फुटल्याने बाथरूम मध्ये असलेल्या युवकाचा जीव गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे…

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव समाधान पाटील (वय २७) राधा वृंदावन अपार्टमेंट दौलत नगर हा युवक दुपारी चार वाजेच्या सुमारास बाथरूम मध्ये असताना बाथरूम मधील गॅस गिझर अचानकपणे फुटले. त्यामुळे गौरव यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला हा प्रकार त्याच्या भावाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी गौरव यास तपासले असता मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एच. व्ही. शेळके करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here