अवघे सात दिवस बाकी : ‘परिसरातील पक्ष्यांची ओळख’ पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांचा अभिनव उपक्रम

pakshi

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आपल्या परिसरात दिसणाऱ्या पक्ष्यांची ओळख आपणास करून देण्यासाठी आम्ही निसर्गमित्र जळगांव तर्फे इ.५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘परिसरातील पक्ष्यांची ओळख’हा उपक्रम पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ राबवित आहेत.

या उपक्रमाबद्दल बुलंद पोलिस टाइम्सशी बोलताना राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले की, या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः सहभाग घ्या व इतर मित्र मैत्रिणींना सहभागी करुन घ्यावे.

या उपक्रमाचा उद्देश:- आपल्या परिसरात काही पक्षी बारा महीने आढळतात पण त्या पैकी फक्त कावळा,चिमणी अशा काही ठराविक पक्ष्यांची नावं आपल्याला माहीत असतात.मात्र अन्य पक्षी दिसत असूनही त्यांची ओळख नसते.या पक्ष्यांची ओळख व्हावी,ही माहिती स्वतः मिळवावी व यातून पक्षी निरीक्षणाचा छ्ंद जडावा या साठी हा उपक्रम हाती घेला आहे.rajendra-and-shilpa-gadgil

 

उपक्रमात सहभाग कसा घ्याल
१ जानेवारी २०२१ रोजी ३० पक्ष्यांच्या छायाचित्रांचा अल्बम व उत्तरपत्रिका तुमच्या दिलेल्या व्हाट्सएपवर पोस्ट करीत आहोत. उत्तरपत्रिकेची झेरॉक्स काढून त्यांवर स्पर्धकाचे पूर्ण नाव,गाव,जिल्हा, इयत्ता व तुमचा व्हाट्सएप क्रमांक लिहा. (पुढील पान – २ वर) आपण अल्बम मधील पक्षी ओळखून त्या पक्ष्यांच्या क्रमानुसार उत्तर पत्रिकेतील त्या क्रमांकापुढे त्या पक्ष्याचे मराठी व इंग्रजी नाव लिहा.

या सोडवलेल्या उत्तरपत्रिकेचा फोटो काढून तो दि.२५ जानेवारी २०२१ पर्यंत व्हाट्सएप क्र.8999809516 वर पाठवा. दि. ३१ जानेवारी रोजी सर्व स्पर्धकांना व्हाट्सएपवर सहभागाचे प्रमाणपत्र पोस्ट केल जाईल. सर्व उत्तरे बरोबर देणार्‍यांना विशेष प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

bird-introductionanser-sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here