पत्नीच्या छळाला वैतागून पतीने रचला स्वतःच्याच हत्येचा बनाव

bhihar-police

पाटणा – बिहारमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पतीने स्वतःच्याच हत्येचा कट रचला. कैमूर जिल्ह्यातील दुर्गावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच काही तासांतच त्याचा छडा लावण्यात आला. स्वतःच्या हत्येचा कट रचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप कुमार राम (वय ३७) याला उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याच्या जमनिया परिसरातून ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी त्याला घरी आणण्यात आले. स्वतःच्या हत्येचा कट का आणि कसा रचला याची कबुली प्रदीपने पोलिसांना दिली. त्याने एका मटन शॉपमधून ४० रुपयांना रक्त विकत घेतले. त्यानंतर अंथरूणावरून टाकले. हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचे वाटावे म्हणून त्याने असे कृत्य केले.

प्रदीपची पत्नी कैमूरच्या एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. दुर्गावती पोलिसांनी प्रदीपविरोधात स्वतःच्या हत्येचा बनाव रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पुन्हा असे कृत्य करू नये, अशी तंबी त्याला दिली आहे.
प्रदीपने पत्नीवरच आरोप केला. पत्नीकडून छळ होत असल्याने वैतागून हे पाऊल उचलले, असे त्याचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रदीपला घरी पाठवले आहे. तर त्याच्या पत्नीला समज दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here