ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन ) – कर्तव्य-एक सामाजिक जाणीव- मायेची ऊब २०२० च्या वर्षात कोरोनाने असा हाहाकार माजवला होता की जनजीवन पूर्णपणे विस्कळित झालं होतं..२०२१ च्या शुभ मुहूर्तावर आपल्या कर्तव्य एक सामाजिक जाणीव संस्थेतर्फे ठाणे पोलीस मुख्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्याना आपणा सर्वांच्या मदतीने मायेची ऊब देऊ केली.
याप्रसंगी पोलीस मुख्यालय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. युवराज पवार व मराठी ग्रंथ संग्रहालय चे पधादीकारी कोपरी विभागातील पोलीस शांतता कमिटी सदस्य निशिकांत महाकाळ ह्यांना आमंत्रित केले होते. आज युवराज सर ह्यांचा जन्मदिवस देखील उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच संस्थेच्या अध्यक्षा कु. तृषाली पवार, उपाध्यक्ष शहाजी पवार, सचिव रुपेश शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटील, राजेंद्र गोसावी, समीर डिके, कु. पूनम सावंत तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास, आपले प्रेम आणि समाजाप्रती आपले कर्तव्य बजावत मायेची ऊब हा उपक्रम दिमाखात पार पडला.असे कर्तव्य एक सामाजिक जाणीव संस्थेने कळविले आहे.







