चाळीसगावात खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय मुलीवर बलात्कार

rape-on-minor

चाळीसगाव (प्रतिनिधी) – खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर 37 वर्षीय नाराधमाने बलात्कार (rape) केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथे 3 जानेवारी 2021 रोजी, रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तर नराधम आरोपीस मनमाड रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेण्यात आले आहे.

यापूर्वीही बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा
आरोपीने 2012 मध्ये 5 वर्षीय बालिकेवर बलात्कार केला होता. त्यावेळी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन त्याला 7 वर्ष शिक्षा झाली होती. तो दोन महिन्यांपूर्वी शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याने बालिकेवर बलात्कार केला आहे.

तालुक्यातील शिरसगाव येथील आरोपी संदीप सुदाम तिरामली याने 3 जानेवारीला गावातीलच 5 वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिला घरात बोलावले. नंतर तिच्यावर रात्री 8 वाजेच्या सुमारास बलात्कार केला. पीडित मुलीने घटनेची माहिती घरात सांगितल्यावर तिच्या पालकांनी लागलीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नाराधमावर गुन्हा दाखल केला. तोपर्यंत आरोपी पळून गेला होता. सपोनि पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोपाळ पाटील, हवालदार योगेश मांडोळे, पो.कॉ. शैलेश माळी, गोरख चकोर यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस मनमाड रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here