जिल्हास्तरीय संवाद सभा राज्याध्यक्षांनी दिली शिक्षक समिती शिलेदारांना प्रेरणा”

maharashtra-shikshak-samiti

मालवण जि.रायगड (प्रतिनिधी सतीश कोळी) – शनिवार दि. २/१/२१ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची “संवाद सभा” सन्मा. राज्याध्यक्ष आदरणीय श्री.उदयजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व सन्मा.कोकण विभाग अध्यक्ष श्री.अंकुशजी गोफणे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये,रायगड जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री.मारूती कळंबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दु. ठिक २.०० वा. हाॕटेल रत्नदिप, माणगांव येथील भव्य दालनामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सर्वप्रथम जिल्हा सचिटणिस अनिल नागोठकर सर यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरूवात अशोकदादा साबळे विद्यालयातील मिलिंद गायकवाड सर यांच्या सुमधूर आवाजातील इशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यांच्या गायनाने सर्वच मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर सन्मा. राज्याध्यक्ष, कोकण विभाग प्रमुख व व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर यांचे तसेच उपस्थित सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य या सर्वांचे तळा व माणगांव शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

अविष्कार फाऊंडेशन संचालित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त रोहा तालुका उपाध्यक्ष मा. संतोष यादव सर व चणेरा विभाग प्रमुख दिपक पाबरेकर यांचे अभिनंदन राज्याध्यक्ष साहेबांच्या हस्ते करण्यात आले. रोहा,कर्जत,पोलादपूर, महाड,तळा,माणगांव तालुका शाखेने आदरणीय राज्याध्यक्ष साहेबांचा आपापल्या तालुक्याच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. प्रज्ञा धोत्रे – महिला आघाडी प्रमुख, अनिल खोपकर-सहसचिव व आरती कुरघुडे – महिला संघटक यांना राज्याध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात आली.

प्रास्ताविक करताना रायगड जिल्हाध्यक्ष मारुती कळंबे साहेब यांनी MSCIT वसुली स्थगिती, शिक्षण सेवक व्यवसायकर कपात अशा अनेक शिक्षक जिव्हाळ्याच्या प्रश्नांची उकल शिक्षक समितीने कशाप्रकारे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला ते सांगितले. त्यांनी शिक्षक समिती शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचे ठणकावून सांगितले

संवाद सभेमध्ये ब-याचजणांनी आपले प्रश्न मांडताना… शालेय पोषण आहार योजना,उपस्थिती भत्ता वाढविणे,वरिष्ठ पदे शिक्षक वर्गातून भरणे,शालेय विजबील समस्या,चक्रिवादळामुळे पडझड झालेल्या शाळांची दुरूस्ती व त्याबाबत तरतूद, १५ वित्त आयोग थेट रक्कम वर्ग होणेबाबत, BLO काम रद्द होणेबाबत, निवडश्रेणी, आदर्श शिक्षक पुरस्कार वेतनवाढ, विषयशिक्षक वेतनश्रेणी याबाबत सविस्तर प्रश्न मांडले.

तालुकास्तरावर उच्च शिक्षण परवानगी, शिक्षकांसाठी cashless madiclaim सुविधा असावी.अप्रशिक्षित शिक्षक सलग सेवा धरणेबाबत सविस्तर सांगितले.तातडीने शाळा सुरू करणे,विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्याय पुस्तिका वाटप करणे, MSCIT कायमस्वरूपी मुदतवाढ तसेच कोर्स फी माफ होणे हे मुद्दे मांडले.शाळेचा कारभार सेवा जेष्ठतेनुसार होणे गरजेचे आहे हे पटवून दिले.चक्रिवादळ शाळाअनुदान तातडीने मिळणेबाबत पाठपुरावा व्हावा असा विचार काहींनी मांडला.त्वरीत शाळा सुरु करुन,, बदल्यांचे स्वरूप स्पष्ट होणेबाबत,विस्थापित शिक्षक प्रश्न सोडविल्याबाबत तसेच कर्जत तालुकास्तरावर शिक्षकांचे एकही प्रश्न प्रलंबित नाही याचा अभिमान असल्याचे सांगितले.

निवडश्रेणी विलंब टाळण्यासाठी ठोस उपाययोजना हवी असा विचार मांडला.अपघात विमा, DCPS हप्ता सुरु,वैद्यकिय बिले,चटोपाध्याय निवडश्रेणी,निवृत्त कर्मचारी पेन्शन,गटविमा आदि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात यश व पाठपुरावा सुरु, तसेच भविष्यात शिक्षक समिती आमदार असावा अशी आशा व्यक्त केली.

कोकण विभाग प्रमुख अंकुशजी गोफणे यांनी जुनी पेंशन साठी नेटाने प्रयत्न सुरू आहेत, PF प्रस्ताव सुरु केले, विस्थापित शिक्षक प्रश्न सोडविला, जिल्ह्यात सर्व तालुक्यात शाखा वाढविण्यासंदर्भात अनमोल मार्गदर्शन केले,शिक्षक समितीने कोरोनाकाळात शिक्षक पगारकपात आजिबात होऊ दिली नाही. हे आवर्जून सांगितले.

राज्याध्यक्ष उदयजी शिंदे साहेब हे रायगडवासियांच्या स्वागताने अक्षरशः भारावून गेले. नवीन वर्षाची सुरूवात रायगडमधील एका सुंदर कार्यक्रमाने झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी आपल्या शिक्षक समिती थोडक्यात इतिहास सांगितला. शिक्षक पतसंस्थेमध्ये आपले संचालक असणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले. MSCIT करीता नक्कीच मुदतवाढ मिळेल. शाळा सुरु होण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे.जुन्या पेंशन योजनेसाठी पराकोटीचे प्रयत्न सुरु,असून केवळ या महत्त्वाच्या विषयाकरिता समितीचे स्वतंत्र युनिट बनविणार व पाठपुरावा करीत राहणार असल्याचे आवर्जून सांगितले. सर्व १००% मुलांना गणवेश मिळतील,बदल्यांसंदर्भात लवकरच निश्चित धोरण बनविणार, शिक्षक समिती बदली धोरणे कसे असावे? हे पाठविणार असल्याचे सांगितले. आंतरजिल्हा बदली प्रकरण, कोकणात १००% शिक्षक भरती व्हावी, उच्च शिक्षण घेतलेल्यांना थेट पदे व वेतनश्रेणी मिळावी, रिक्त अधिकारी पदे १००% शिक्षक वर्गातूनच भरण्यासाठी आग्रही, असल्याचे सांगितले.
सर्व समिती शिलेदारांनी संघटनावाढीसाठी अधिकाधिक सभासद नोंदणी करून संघटनेला राज्यात प्रथम क्रमांकाची मोठी संघटना बनविण्यासाठी आवाहन केले, भावी काळात राज्य कार्यकारणी मध्ये रायगडच्या शिलेदाराला संधी नक्कीच दिली जाईल हे अधोरेखित केले. पेण शिक्षक पतपेढी निवडणुकीचे गेली दोन दशके यशस्वी नेतृत्व करणारे राजेश जाधव व विद्यमान उमेदवार नारायण गायकर,विजय येलवे,व ज्ञानेश्वर बुरूड यांना राज्याध्यक्ष मा.उदयजी शिंदे साहेबांनी यांनी विजयी भव शुभेच्छा दिल्या.

सदर संवाद सभेस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष सन्मानीय श्री.उदयजी शिंदे, कोकण विभाग प्रमुख सन्मा.श्री.अंकुशजी गोफणे, रायगड जिल्हाध्यक्ष श्री.मारूती कळंबे, जिल्हा सरचिटणिस अनिल नागोठकर, जावळी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन धिरेश गोळे, सातारा तालुका पदाधिकारी नितीन मोहिते,मंडणगड तालुका पदाधिकारी भुवड सर, कोकण संपर्क प्रमुख सुधिर सकपाळ,रायगड जिल्हा परिषद निमंत्रित सदस्य श्री अजय कापसे, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर पाटील, जिल्हा समन्वयक राजेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत मोंढे व विजय पवार, जिल्हा कार्यालयीन चिटणिस ब्रिजेश भादेकर, सहृसचिव अनिल खोपकर, जिल्हा संपर्क तथा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद साळवी, सहसंपर्क प्रमुख सौ.आश्विनी पार्टे, जिल्हा संघटक आदेश साळवी,महिला आघाडी प्रमुख प्रज्ञा धोत्रे,महिला संघटक अरुणा लाड,तन्वी गुरव,कल्याणी वाजे,तालुकाध्यक्ष,सचिव व पदाधिकारी रोहा नारायण गायकर, किशोर जाधव,जयेश भोईर,संतोष यादव,सहदेव कापसे,किशोर पोळेकर,शरद पाटील,विद्या रोहेकर,विनायक शिंदे,प्रशांत चोरगे,बालाजी राठोड,प्रमोद म्हात्रे,संतोष जाधव,अमिता बामणे,पल्लवी गायकर,सायली दिवकर, तालुकाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी कर्जत:- तानाजी गवारी,सुनिल जाधव,जगदीश पाटील,अनंत खैरे,ज्ञानेश्वर बुरुड,समीर येरूणकर,संजय पानपाटील, खाकर सर, तालुकाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी:- तळा-विजय येलवे व सुनिल बैकर,राजु थिटेकर,,अमिष भोड,जगदिश कासे,कल्पना पवार, तालुकाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी -माणगाव:-सुधाकर पालकर व रमेश उभारे,जयेंद्र वाघमारे,चंद्रकांत जाधव,पराग जाधव,बाबू सकपाळ,रमेश मोरे, तालुकाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी- महाड:- प्रशांत जाधव व राकेश मोहिते,विनायक शिंदे,अंकुश महाडिक,संतोष मोरे,विशाल जाधव,सौ.आरती कुरघोडे,तालुकाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी- पोलादपूर:-विलास उतेकर व प्रदिप दिक्षित,चंद्रकांत उतेकर, श्री.पांडुरंग सुतार, श्री. दिपक निकम,रमेश सोनवणे. तसेच रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सभासद, शिक्षक बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तम आयोजनाबद्दल तळा व माणगाव शाखेचे तालुकाध्यक्ष विजय येलवे सर,सुधाकर पालकर सर व त्यांच्या संपूर्ण टिमचे सर्वांनीच कौतुक केले. कार्यक्रमात खालील पदाधिका-यांनी आपले मनोगत व्यक्त केले.रोहा तालुकाध्यक्ष नारायण गायकर,रोहा तालुका उपाध्यक्ष संतोष यादव,जिल्हा कार्यालयीन चिटणीस,ब्रिजेश भादेकर,कर्जत तालुका सचिव सुनिल जाधव,रोहा कोषाध्यक्षा विद्या रोहेकर मॕडम, माणगाव सचिव रमेश उभारे,जिल्हा समन्वयक राजेश जाधव,कोकण विभाग संपर्क प्रमुख सुधिर सकपाळ राजिप क्रीडा शिक्षण निमंत्रित सदस्य अजय कापसे आदी उपस्थित होते. संवाद सभेचे सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार व आभार जिल्हा कार्याध्यक्ष किशोर पाटील यांनी मानले.अशी माहिती प्रसाद साळवी जिल्हा संपर्क तथा प्रसिद्धी प्रमुख शिक्षक समिती, रायगड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here