भोकरी फाट्याजवळ भरधाव कंटेनरची मोटारसायकलला धडक महिला जागीच ठार…!

raver-accident

रावेर (जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी) – तालुक्यातील भोकरी फाट्याजवळ दुपारी भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर ट्रकने मोटारसायकल ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेर-बुऱ्हाणपूर रोडवर भोकरी फाट्याजवळ रविवारी दुपारी १.५० मी.घडली.

त्यात मंगलाबाई सोपान शिरसाठ वय ३८ रा.वखारी ता.जी.बुऱ्हाणपूर ही महिला जागीच ठार झाली असून तिचा पती या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. वखारी येथील रहिवासी असलेले सोपान कडू शिरसाठ हे पत्नी मंगलाबाईसह केऱ्हाळा येथे पत्नी च्या नातेवाईकाकडे शनिवारी मुक्कामी भेट घेण्यासाठी आलेले होते.व ते दुपारी घरी वखारी येथे स्वतःजवळची मोटरसायकल क्र.एम. पी.१२ एम.डी ९१५८ ने जात असताना रावेरकडून बुऱ्हाणपूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रक क्रमांक-एम.पी.०७ एच.बी ३३७१ ने जोरदार धडक दिल्याने मंगलाबाई जागीच ठार झाली तर तिचा पती सोपान शिरसाठ हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना पुढील उपचारासाठी बुऱ्हाणपूर येथे पाठविण्यात आले असून याबाबत देवानंद नारायण तायडे रा.केऱ्हाळा खु.यांच्या फिर्यादी वरून कंटेनर चालक रामप्रसाद जगदीशसिंग यादव रा.गोरमी ता.मेहेगाव जी.भिंड (मध्यप्रदेश) या विरुद्ध भादवि कलम ३०३(अ) २७९,३३७,३३८,४२७ एम व्ही अक्ट कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पो.निरीक्षक श्री.वाकोडे साहेब रावेर पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने पो.उपनिरीक्षक श्री.जाधव हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here