जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – रविवार दिनांक 03/01/2021 रोजी प्रथम महिला शिक्षिका,समाज सुधारिका व कवियत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त दाणा बाजार येथील दत्त मंदिराजवळ जळगाव येथील रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

सुरुवातील फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रा मालपाणी ह्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात आली. कार्यक्रमाला रिध्दी जान्हवी फाऊंडेशनचे चंदन पाटील, किरण कोलते, सतीश दायमा, सौ.पद्मावती राणा,सौ.कीर्ती राणा,सौ.निशा पाटील, सौ.संगीता दायमा, इत्यादी सभासद हजर होते. कार्यक्रमाची रूपरेषा कीर्ती राणा यांनी तर आभार प्रदर्शन चंदन पाटील यांनी केले.







