उघड्यावर लघुशंका करण्यापासून रोखले म्हणून तरुणाची हत्या

marhan-and-murder

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – येथील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यापासून रोखणाऱ्या तरुणाची चौघांनी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

सचिन पाटील (वय ३५) हा शुक्रवारी जखमी अवस्थेत रस्त्यालगत पडलेला होता. जवळच्या रुग्णालयात काही जणांनी त्याला दाखल केले. मात्र, तिथे त्याला तपासणीनंतर मृत घोषित केले, अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दिली.

आकाश गायकवाड (वय २०) याचे पाटीलसोबत भांडण झाले होते. पाटीलने आकाशला उघड्यावर लघुशंका करण्यापासून रोखले होते. साठे नगरमध्ये ही घटना घडली. गायकवाड आणि अन्य तिघा मित्रांनी पाटीलला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत तिथेच सोडून पसार झाले, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता, ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here