किरकोळ कारणावरून पुण्यात दोन महिलांमध्ये भर रस्त्यात जुंपली

fights-in-lady

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – वडापावची हातगाडी चालवणाऱ्या महिलेच्या पतीचा एका ग्राहक महिलेस धक्का लागला. यामुळे ग्राहक महिलेने तीच्या पतीला हाताने पर्सच्या सहाय्याने मारहाण केली.

यावेळी पतीला पत्नी वाचवण्यास गेली असता, संबंधीत महिलेने तीच्या छातीवर बुक्के मारुन व नखांनी डोळ्याखाली ओरबडून जखमी केले. ही घटना विश्रांतवाडी येथील बुध्दविहारमागे घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका 36 वर्षीय महिलेविरुद्द गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी 39 वर्षीय महिला व तीच्या पतीची बुध्दविहारमागे वडापावची गाडी आहे. सायंकाळी पती-पत्नी दोघेही वडापावच्या गाडीवर काम करत होते. यावेळी फिर्यादी महिलेच्या पतीला तेथे ग्राहक म्हणून आलेल्या महिलेस धक्का लागला.

याचा राग येऊन संबंधीत महिलेने फिर्यादीच्या पतीस हाताने व पर्सच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी फिर्यादी पतीला वाचवण्यासाठीमध्ये पडल्या. यामुळे संबंधीत महिलेने फिर्यादीच्या छातीवर बुक्कया मारल्या तसेच हाताच्या नखाने डोळ्याच्या खाली ओरबडून जखमी केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here