नागपूरमध्ये ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

gang-rape-on-minior

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराची धक्कादायक तितकीच संतापजनक घटना जिल्ह्यातील खिंडसी परिसरात समोर आली. ही घटना २९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५च्या सुमारास समोर आली.

अतुल विश्वनाथ हटवार (वय २५, रा. आंधळगाव), धीरज जयराम मेहेरकुळे (वय २७), सौरभ दिलीप मेहेरकुळे (वय २४), हर्षल राजू मेहेरकुळे (वय २६) आणि हेमदास तराचंद मेहेरकुळे (वय ३१ रा. दुधाळा) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी तिच्या सायकलने वही आणायला जात असताना आरोपी अतुलने तिचे अपहरण केले.

त्यानंतर अतुल आणि इतर सर्वच आरोपींनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय धास्तावले होते. मात्र, अखेर त्यांनी हिम्मत करून पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी सर्वच आरोपींवर भादंवि, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा आणि अनुसुचित जाती/अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला करून सर्वच आरोपींना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here