पती – पत्नीच्या भांडणातून रागाच्या भरात गळा दाबून पत्नीचा खून

murder-of-wife

सोनीपत – हरियाणातील सोनीपत येथे घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपत येथील अकबरपुर बरोटा येथे पती आणि पत्नी यांच्यात सतत भांडण होत असे. ते अकबरपुर येथे भाड्याच्या घरात राहत असत. सहा वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अनेक दिवसांपासून पति-पत्नी यांच्यात भांडण सुरू होते. शनिवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले आणि रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे बोलले जात आहे.

आरोपी एका कंपनीत काम करतो तर पत्नी घर सांभाळत होती. मृताच्या गळ्यावर खुणा दिसत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोनीपत येथील रूग्णालयात पाठवण्यात आला असून सोनीपत पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलीसांनी सांगितले की, अकबरपूर बरोटा गावातील सरपंच रमेश यांनी गावात एका कुटुंबात पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला. पतीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या अटकेनंतरच अधिक माहिती मिळेल, असे पोलीसांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here