वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस ठाण्यात खळबळजनक घटना घडली आहे. एका तक्रारकर्त्याने पोलीस ठाणे परिसरात असलेल्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळं पोलिसात एकच खळबळ उडाली.
कौटुंबिक वादाने त्रस्त असलेला अशोक राऊत (55) हा व्यक्ती रात्री ठाण्यात जाऊन तक्रार करून घरी परतला. पण त्याला अपेक्षित कारवाई न झाल्याने तो आज पहाटेच्या सुमारास पुन्हा ठाण्यात आला आणि याच परिसरात असलेल्या पत्राच्या शेडखाली गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत अशोक राऊत हेसिंदेवाही इथल्या दसरा चौकातील वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून ते कौटुंबिक कलहाने त्रस्त होते, अशी माहिती पुढे आली आहे. याबात पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेनंतर सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी राऊत यांना मृत घोषित केले.







