गर्दी जमवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल बर्थडे बॉयसह आठ जणांवर गुन्हा दाखल

birthday

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – करोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यात शनिवारी (दि. 2) एका तरुणाने गर्दी करून त्याचा वाढदिवस साजरा केला. याबाबत बर्थडे बॉयसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश अरुण पवार (वय 20, रा. काळेवाडी) असे बर्थडे बॉयचे नाव आहे. त्याच्यासह ऋषिकेश भुजबळ, भूषण कुदळे (दोघे रा. पिंपरीगाव), अनिल भंडारी, आकिब खान, सुरज कदरापुरकर (तिघे रा. काळेवाडी), कृष्णा डोळे, आकाश भोसले (दोघे रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस नाईक रजनीकांत कोळी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी निलेश याचा 2 जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्याने मित्रांना एकत्र बोलावत शनिवारी रात्री अकरा वाजता वाढदिवस साजरा केला. शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here