पुण्यात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्य़ाला अटक

pune-pistol

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्य़ा तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतुस जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम रामदीन बाबू असे अटक केलेल्याचे नाव आहे. कासेवाडी भागात एकजण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे कर्मचारी इम्रान शेख व सचिन जाधव यांना मिळालीr. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या पथकाने बाबूला ताब्यात घेतले.

त्याच्या कमरेला पिस्तूल आढळून आले. त्याने हे पिस्तूल कोठून आणले याचा शोध सुरू आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस आयुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, सतीश भालेकर, इम्रान शेख, सचिन जाधव, शशिकांत दरेकर, महेश बामगुडे, प्रशांत गायकवाड, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here