दर्पणदिनानिमित्त जायंट्स ग्रुप खुलताबादतर्फे पत्रकारांचा सत्कार

khultabad-journalist

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता हाच समृद्ध समाजाचा भक्कम पाया आहे याचे औचित्य साधून पत्रकार दिनाच्या निमित्ताने काल (दि.६) जायंटस् ग्रुप आँफ खुलताबाद च्यावतीने खुलताबाद येथील सर्व पत्रकार बांधवाचा आरटीओ रविंद्र नारळे यांचे हस्ते सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमास जायंट्स वेलफेअर फाऊंडेशन-फेडरेशन २ ब चे समन्वयक राजेंद्र चव्हाण, युनिट डायरेक्टर दिनेश सावजी व फेडरेशन आँफीसर सुनील मरकड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुलताबाद ग्रुपचे अध्यक्ष जफरखान पठाण होते.

khultabad-satkarkhultabad-patrakar

कार्यक्रमात मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै.लोकमतचे सुनील घोडके, दै.सकाळचे दत्ता कोठारी, दै.सामनाचे श्रीकांत कुलकर्णी, दै. सांजवार्ता व दै. पुण्यनगरी चे किशोर पुसे, दै.महाराष्ट्र टाईम्स चे विजय चौधरी, दै. दिव्यमराठीचे शेख जमीर, दै.लोकमत समाचार चे इस्हाक कुरैशी, दै. देवनगरीचे दिनेश सावजी, दै. पुढारीचे सुनील मरकड,दै. केसरीचे संदीप औताडे, एमसीएन टिव्ही चे मच्छिंद्र घोरपडे, बुलंद पोलिस टाईम्सचे सलमान खान , सय्यद लाल, विरेंद्र वाघ आदी पत्रकार बांधवाचा सत्कार करण्यात आला. यावेळी समन्वयक राजेंद्र चव्हाण म्हणाले की,बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्याप्रमाणे निर्भिडपणे पत्रकारिता केली,त्यांचा आदर्श आज सर्व पत्रकारांसमोर आहे.तो आदर्श घेऊन निर्भिडपणे पत्रकारिता करायला हवी.

k1

k2यावेळी कार्यक्रमास जायंटस् चे माजी अध्यक्ष गणेश दाभाडे, नवनाथ बारगळ, दिनेश अंभोरे, बी दामोदर, श्रीहरी जाधव, गोरक्षनाथ बारगळ, कल्याण भदगले, संदेश केरे, शैलैद्र भणगे, संजय तुपे, सुजय खरोटे,गणेश पवार, ज्ञानेश्वर पवार, रवींद्र अष्टेकर, अनिल भालेराव, उध्दव लिंगायत, राहूल गावीत, संतोष ठेंगडे,प्रा.दिपक फुलारे, अँड.अविनाश औटे, यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रुपचे सचिव सतीश कोळी तर आभार कोषाध्यक्ष राजाभाऊ वायाळ यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here