म्हसवे गावात अल्पवयीन मुलाचा मित्राकडून खून

friends-murder

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – सातारा शहरालगत म्हसवे (ता. सातारा) येथे बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसर हादरून गेला असून ही घटना बुधवारी रात्री समोर आली. पोलिसांनी म्हसवे गावात जावून रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

गंगाराम रमेश राठोड (वय 12, रा.म्हसवे ता.सातारा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. हा मुलगा दि. 5 रोजी सायंकाळी घरासमोरुन बेपत्ता झाला.

मुलगा बराच वेळ घरी न आल्याने त्याच्या आईने शोधण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला मात्र गंगाराम सापडला नाही. यामुळे आई ललिता राठोड यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here