बावधनमधील व्यापाऱ्याच्या घरातून १५ किलो गांजा जप्त

pune-arrest

पुणो (प्रतिनिधी सुनिल भोसले) – गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलीस आणि अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. पुण्यातील बावधनमध्ये सोमवारी दुपारीही अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करून दुकान आणि व्यापाऱ्याच्या घरातून तब्बल १५ किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा राजस्थान आणि सध्या बावधनमध्ये राहणाऱ्या प्रेमसिंग याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बावधनच्या पाटील नगरात प्रेमसिंगचे दुकान आहे. या व्यापाऱ्याने दुकानात गांजा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी दुकानात आणि व्यापाऱ्याच्या घरी छापे मारले. तेथून १५ किलो ८०९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याशिवाय मोबाइल व इतर साहित्य असा जवळपास साडेचार लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रेमसिंगला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here