जळगाव (संपादक सुनिल पाटील) – धर्मरथ फाउंडेशन’ने कोरोना या भयानक महामारीच्या सुरुवाती काळापासून जे कार्य जळगावच्या नागरिकासाठी केलं किंवा सामाजिक कामांमध्ये आपली माणुसकी जपून मायबाप जनतेसाठी कार्य केले जसे की जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये औषध फवारणी,समशानभूमी येथे सॅनिटाझर च्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केले,अल्सरीक अल्बम-३० च्या गोळ्या पाच हजार लोकांपर्यंत घरोघरी जाऊन देण्यात आल्या अतिशय बिकट परिस्थिती असताना नागरिकांना मोफत जेवण वाटण्यात आले अशी मदत धर्मरथ फाउंडेशनने केला.
शिवाजी नगरचा मनपा डीबी जैन हॉस्पिटल 17 किलोमीटर लांब डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज या ठिकाणी स्थलांतरित होणार होते परंतु फाउंडेशनच्या माध्यमातून व विनायक पाटील यांच्या पाठपुरावा मुळे तो प्रसूतिगृह थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला,जळगाव रेल्वे स्थानकात कोविड स्पेशल ट्रेन मधील प्रवाशांना जेवण व पाणीची वेवस्था फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली,लॉकडाउन च्या काळात महामार्गावर बरेच परप्रांतीय नागरिक पायी जात असताना भर उन्हाळात पिण्याचे पाणीचे रांजण व जेवणाची वेवस्था फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली, आरोग्यसेवक व मनपा सफाई कर्मचारी यांचा सत्कार केला अशी बरेच काम करण्याचा प्रयत्न धर्मरथ फाउंडेशन त्यांचे सर्व पदाधिकारी व सदस्यच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली.
या सर्व कार्याची दखल घेऊन जळगाव महानगरपालिका चे उपायुक्त पवन पाटील तसेच प्रभाग अधिकारी विलास सोनवणी यांच्या माध्यमातून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या ठिकाणी उपस्थित धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील,संतोष भिताडे, हिरामण तरटे,विपीन पवार,निशांत पाटील,प्रकाश मुळीक,ईश्वर शिंदे,तुषार सूर्यवंशी, धर्मद्र चौधरी, सागर बडगुजर, दीपक पवार,मिलिंद बडगुजर,प्रमोद महांगडे,सुनील महांगडे, दिनेश पाटील,विशाल महांगडे,ओम महांगडे या सर्वांचे सहकार्य लाभले..








