सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – शहरबाह्य वळण रस्ता म्हणजे बायपास रोडवर अलीपूर व परंडा चौकाच्या मधोमध दोन गाड्यांची टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाडीचे चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो ही गाडी कुर्डुवाडीकडून येत असताना माल वाहतूक ट्रकही बायपास मार्गे जात होती, त्यात दोन्ही ड्रायव्हार यांच्या चकमकीत अपघात घडला. दोन्ही गाड्यांचा हा अपघात समोरासमोर झाला असून दोन्ही चालक गंभीर जखमी आहेत. तर, दोन्ही गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अपघातानंतर, बायपास रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान, तेथील स्थानिक पत्रकार आणि नागरिकांनी बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी तेथे पाठवले. त्यानंतर रुग्णावाहिकेलाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, जखमी चालकांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.







