विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सातव्या वेतन आयोगाबाबत निवेदन

vardha-teacher

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारीच्या वेतनात समाविष्ट करण्या बाबत आज दिनांक 5/1/2021 रोज मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूरतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर व वेतन पथक अधीक्षक श्री पाटील यांना निवेदन देण्यात आले.

सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता नागपूर विभगातील काही जिल्ह्यात मिळाला आहे. वी मा शी संघ ने हा मुद्दा 30 डिसेंबर 2020 ला ना. बच्चुभाऊ कडू यांच्यासोबत झालेल्या चर्चेत दिलेल्या निवेदनात ठेवण्यात आलेला होता. यावेळेस शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांनी अतिरिक्त अनुदान मिळण्याकरता कृष्णा डहाळे अधिक्षक वेतन शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांना पत्र पाठवण्याचे आश्वासन संघटनेला दिले आहे. यावर कार्यवाही झाली नाही तर संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी कार्यालयाला घेराव करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अनिल गोतमारे , प्रमोद रेवतकर ,संजय वारकर , विठ्ठल जूनघरे , लोकेश व्होरा , गंगाधर पराते ,प्रमोद अंधारे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here