‘ब्रीद..’ मधील सहकलाकारांनाही करावी लागणार कोरोना टेस्ट

मुंबई (जॉनी वाझ) – बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय अभिनेता अनुपम खेर यांच्याही घरातील ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, नुकताच एक सुप्रसिद्ध अभिनेता अमित साधनेही कोरोना चाचणी केल्याचे सांगितले आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे आणि त्यासोबतच लवकरच कोरोना टेस्ट होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.
अमित साध याने अभिषेक बच्चनसोबत नुकतीच रिलीज झालेली वेब सीरिज ‘ब्रीथ: इन शेडोज’ मध्ये सह-कलाकाराचे काम केले आहे. अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर अमित साधची कोरोना टेस्ट होणार आहे. सोशल मीडियातील बऱ्याच लोकांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा झटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here