औंध पोलिसांच्या कारवाईत गुटख्याची 75 पोती जप्त

aundh-gutkha

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – विटा ते पुसेसावळी रस्त्यावर गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या शिवनाकवाडी ता. बत्तीश शिराळा येथील दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांचेकडून 75 गुटख्याची पोती, इर्टिगा कार असा सुमारे बारा लाख 34 हजार रुपयांचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला असून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, पुसेसावळी ते चोराडे रस्त्यावर गस्त घालत असताना औंधचे सपोनि उत्तम भापकर, पोलीस नाईक संतोष कोळी, प्रशांत पाटील, वळकुंद्रे, पोळ, शिंदे होमगार्ड नलवडे, महामुनी, हुलगे यांच्या पथकाला चारचाकी इर्टिगा गाडी एम. एच. 08 झेड 2471 मध्ये मागील बाजूस 75 पोती व चार बॉंक्‍स गुटखा बेकायदेशीरपणे ठेवल्याचे आढळून आले.

हा सर्व मुद्देमाल व संशयित स्वप्नील सुरेश शेंडके (वय 21) व आकाश विजय पवार रा. शिवनाकवाडी ता. बत्तीस शिराळा यांना औंध पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून सपोनि उत्तम भापकर अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here