पोलीस कॉन्स्टेबलच निघाला अट्टल वाहनचोर

arrested

मोगा (पंजाब) – नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र, पोलीसच नागरिकांची लूट करू लागले तर दाद मागायची कुणाकडे? असेच एक प्रकरण पंजाबच्या मोगा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कृत्याने खाकी वर्दीला काळिमा फासला आहे. तो पोलीस कॉन्स्टेबलच चोर निघाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील चोरीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.

मोगाच्या बाघापुराना परिसरातील ही घटना आहे. पोलिसांनी छापेमारी करून पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. गुरबिंदर सिंह उर्फ गोरा असे आरोपी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पंजाब पोलीस विभागात तो कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. सध्या तो फरीदकोटमध्ये एआरपी पथकात होता. त्याला दारूचे व्यसन आहे. तो बहुतांश वेळा सुट्टीवर असायचा. कॉन्स्टेबल गुरबिंदर आणि त्याचा साथीदार गुरप्रीत सिंह गोपीविरोधात ११ डिसेंबरला दुचाकी चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी करून त्याचा साथीदार गुरप्रीतला अटक केली.

त्यानंतर कॉन्स्टेबल गुरबिंदर सिंहलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात फरीदकोटमधील शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here