चॉकलेटचं आमिष दाखवून सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

rape-on-minor

बिकानेर (राजस्थान) – सहा वर्षांच्या चिमुरडीवर चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणातला आरोपी या चिमुरडीचा शेजारी होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पीडित चिमुरडीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

माणुसकीला काळिमा फासणारी आणि प्रत्येकाला संताप करायला लावणारी ही घटना राजस्थानमघील बिकानेर मधील नयाशहर या भागात घडली आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी या प्रकरणातल्या आरोपीनं तिला चॉकलेटचं आमिष दाखवून घरामध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले.

या प्रकरणाची माहिती दुसऱ्या दिवशी समजताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. त्यांनी रामपुरा बायपासवर आंदोलन केलं. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत जवळपास अर्धा डझन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. तरीही त्यांना कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या घरासमोरील CCTV फुटेज पोलिसांनी तपासलं. या फुटेजमध्ये ती चिमुरडी तरुणासोबत जाताना दिसली. या पुराव्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here