कन्नड (प्रदीप मोरे) – तालुक्यामध्ये आज 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे . त्यापैकी, हतनूर 03, नागापूर 1, नर्सिंगपूर 1,नागद 2,बोरमळा नागद 1,येथील रहिवासी आहे,तेथील संबंधित रुग्णांचे राहते घर , रस्ते,गाव,भाग प्रतिबंधित केलेले आहे .आजपर्यंत कन्नड तालुक्यामध्ये एकूण 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 59 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत .55 रुग्णाचा उपचार ग्रामीण रुग्णालय कन्नड, शिवाजी महाविद्यालय होस्टेल CCC नगरपरिषद कन्नड व औरंगाबाद येथे चालू आहे व 03 जणांचा मृत्यू झाला आहे. कन्नड शहरांमध्ये आज पर्यंत 41 रुग्ण व ग्रामीण मध्ये 76 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.







