शेजारच्या मुलाशी प्रेमसंबंध होते म्हणून आईवडीलांनी घेतला मुलीचा जीव

deadbody-of-girl

मिर्झापूर – झाआई-वडील मुलांसाठी काहीही करण्यास तयार असतात. मुलांनी मागितलेली प्रत्येक वस्तू त्याला देण्यासाठी खटपट करत असतात. मुलांवरील प्रेमापोटी ते कोणताही त्याग करण्यासाठी तयार करतात. मात्र, आई-वडील आणि मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमध्ये घडली आहे. मिर्झापूरमध्ये आईवडिलांनी आपल्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिर्झापूरच्या जमालपूरमध्ये 5 जानेवारीला एका शेतात मुलीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत मुलीची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. अंजली उर्फ पुष्पा असे मुलीचे नाव असून तिचे वय 17 वर्ष असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी घटनेची नोंद करून तपासाला सुरुवात केली.

अंजलीचे घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. याबाबत तिच्या आईवडिलांना समजले. त्यांनी या संबंधांना विरोध करत मुलापासून दूर राहण्यासाठी अंजलीला सांगितले. त्यानंतरही तिच्या घरच्यांनी अनेकदा तिला त्या तरुणासोबत बघितले होते. अंजलीला त्या तरुणाशी लग्न करायचे होते. मात्र, तो तरुण लग्नासाठी तयार नव्हता. त्यामुळे अंजलीला घरच्यांनी समजावले आणि त्याच्यापासून दूर राहा, असे सांगितले.

कटुंबीयांनी समजावल्यानंतरही ती कोणाचेच एकत नव्हती. 2 जानेवारीला रात्री 10 वाजता ती घरी परतली. त्यानंतर प्रेमसंबंधांवरून अंजलीचा आईवडिलांशी वाद झाला. अंजलीला विविध प्रकारे समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजात आपली उपेक्षा होईल, असे तिला सांगितले. मात्र, याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

प्रियकर लग्नाला देत असलेला नकार आणि आईवडिलांचा विरोध यामुळे अंजलीला राग अनावर झाला. माझ्यामुळे समाजात उपेक्षा होत असेल तर मला मारून टाका, असे ती रागाच्या भरात म्हणाली. तिच्या या बोलण्याने आई-वडिलांना धक्का बसला. त्यांनाही राग अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात ओढळीने गळा आवळत तिची हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर ते घराला कुलूप लावत निघून गेले. त्यांनी योजनेप्रमाणे 4 जानेवारीला अंजलीचा मृतदेह गावाजवळच्या शेतात फेकून दिला. या हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी अंजलीच्या आईवडिलांना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here