अलिबाग तालुक्यात आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा लक्षणीय वाढ, 37 नवीन रुग्ण

बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 367 वर,
आज 13 रुग्णांची कोरोना वर मात
अलिबाग-सोगावकर – काल (दि.१२) अलिबाग तालुक्यातरोजी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे,वाढती संख्या कमी होण्याऐवजी त्यामध्ये चिंताजनक वाढ होत आहे,दररोज 2 अंकी संख्येने वाढ होताना दिसत आहे,
आज तालुक्यातील 37 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 367 वर गेली आहे, यापैकी 153 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे,
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खानाव,पेझारी, लोणारे,आंबेपुर,देहेन,शहापूर, कोलटेंभी,सासवणे, चेंढरे, सिद्धार्थ नगर-अलिबाग,उसर, अलिबाग-कोळीवाडा,गोंधळपाडा, कातळपाडा-सातिर्जे,बहिरोळे, मानकुळे, वरसोली, थळ-आगार, बामणोली, पिंपळभाट, श्रीबाग नं 3,रामनाथ-अलिबाग येथील रुग्णांचा समावेश आहे.
गोकुळेश्वर नगर-गोंधळपाडा येथे 46 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, चेंढरेतील गोल्ड कोस्ट सोसायटी येथील 45 वर्षीय महिलेची कोरोना ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,सातिर्जे-कातळपाडा येथील चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, यामध्ये 58 वर्षीय पुरुष,49 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालक,आणि 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे,
बहिरोळे येथील 30 वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,
अलिबाग शहरातील सिद्धार्थ नगर येथे आज पुन्हा 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, येथील 22 वर्षीय तरुण व 17 वर्षीय मुलगी असे 2 रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,तसेच अलिबाग कोळीवाडा येथील 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 7 वर्षीय मुलगी,62 वर्षीय महिला,27 वर्षीय तरुणी यांना कोरोना झाला आहे, उसर येथील 62 वर्षीय वृद्ध व्यक्ती आणि 57 वर्षीय महिला अश्या दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,
वरसोली मध्ये आज आणखी एक रुग्ण मिळाला आहे, येथील 69 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे,मानकुळे येथे 27 वर्षीय तरुण आणि 52 वर्षीय महिला अश्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, गोंधळपाडा येथील 48 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे,
थळ आगार येथील 26 वर्षीय तरुणाला, बामणोली येथील 26 तरुणाला, पिंपळभाट-स्वामीसमर्थनगर 45 वर्षीय महिलेला, श्रीबाग नं 3 येथील 29 वर्षीय महिलेला व रामनाथ-कुंभारआळी येथील 68 वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे,
खानाव येथील 2 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, येथील 44 वर्षीय महिला आणि 59 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, पेझारी दिवलांगआळी येथील 22 वर्षीय तरूणीला कोरोनाची लागण झाली आहे, लोणारे येथील 28 वर्षीय तरूणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,आंबेपुर-सुभाष नगर येथे 3 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, येथील 20 वर्षीय तरुण,52 वर्षीय महिला व 56 वर्षीय पुरुष अश्या 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, देहेन-अलिबाग याठिकाणी 2 रुग्ण मिळाले आहेत, यामध्ये 42 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला अश्या 2 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, शहापूर येथील 20 वर्षीय तरुण व 24 वर्षीय तरुणी अश्या 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, कोलटेंभी येथील 50 वर्षीय महिला व चेंढरे संत रोहिदास नगर येथील 58 वर्षीय महिला तसेच सासवणे येथील 31 वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे.
तर आज 13 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, सहाणगोठी 1, भिलजी 1, चोरगुंडी 1, पेझारी वात्सल्य रेसिडेन्सी 2, महान 1, बोरीस 1, विद्यानगर साईकृपा सोसायटी येथील 1, कुसुंबळे येथील 1, ब्राम्हण आळी-अलिबाग 1, पोयनाड 1, इंद्रप्रस्थ गोंधळपाडा येथील 1 व भालचंद्र छाया विद्यानगर येथील 1 अश्या 13 रुग्णांना आज रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, 37 नव्या रुग्णांमुळे अलिबाग तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या 367 झाली आहे, यापैकी 153 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, सध्यस्थितीत 205 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.
कोरोना चे वाढणारे पेशंट व नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारले असता अलिबाग तालुक्यातील किहीम गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक श्री प्रशांत कर्वे यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाने स्वतः च्या शरिराला क्वारंटाईन न करता,मनाला क्वारंटाईन करावे,नुसते तोंडाला दुसऱ्याना दाखवण्यासाठी मास्क लावू नये, तर स्वतः च्या सुरक्षेसाठी वापर करावा, वेळोवेळी सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर वापर करावा, आपल्या कुटुंबाची,व आपल्या समाजाची काळजी घ्यावी, असे सांगितले.
तर दुसरी महत्त्वाची प्रतिक्रिया देताना श्री पिंट्या प्रसाद गायकवाड चोंढी, सदस्य ग्रुपग्रामपंचायत किहीम,यांनी सांगितले की,सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला कोरोना सोबत जगायचं आहे आणि सर्वांनी सोबत राहून त्याच्या विरोधात लढायचं आहे, म्हणजे प्रत्येकाने आपल्या स्वतःसहित कुटुंबाची काळजी घेतली पाहिजेच, तसेच प्रशासनाने कोरोना हा आजार गंभीर असला तरी,खंबीरपणे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या व त्यांच्या कुटुंबियांना लागेल ती मदत पोहचवायला हवी, सध्या या सर्व गोष्टींची उणीव भासत आहे, हॉस्पिटल मध्ये गैरसोयी आढळून येत आहेत, यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे,असे शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here