चाकूच्या धाकावर उकळली खंडणी

kinef-attack

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – चाकूचा धाक दाखवून पानठेलाचालकाला दहा हजारांची खंडणी मागून दोन हजार रुपये बळजबरीने हिसकावण्यात आले. ही घटना नंदनवमधील श्रीकृष्णनगर भागात घडली.

पानठेलाचालक गुणवंत भगवान सोनटक्के (वय ३१, रा. पडोळेनगर) याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. निखिल ऊर्फ डंबा मनोहर वासनिक (वय २०, रा. हिवरीनगर) व अक्षय ऊर्फ गोलू रवींद्र बोरकर (वय २३, रा.पडोळेनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here