वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – खेळताना भांड्यातील उकळते पाणी अंगावर पडून होरपळलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना एमआयडीसीतील भीमनगर येथे घडली.
सोनाक्षी सुनील उईके असे मृतकाचे नाव आहे. ३ जानेवारीला सकाळी सोनाक्षी खेळत होती. खेळता खेळता ती गरम पाण्याच्या भांड्यावर पडल्याने होरपळली. नातेवाइकांनी तिला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, आग आणि उष्ण वस्तू तसेच इतर धोकादायक वस्तू लहान मुलांपासून दूरच ठेवाव्यात, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.




