नववधूने गाठले पोलीस स्टेशन; सासूने चार मुलांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास पाडले भाग

newly-married-bride

नवी दिल्ली – लग्नानंतर नववधूला भोगावे लागणारे अत्याचाराचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीजवळ असलेल्या उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये समोर आला आहे. वधूने आरोप केला आहे की धाकट्या भावाला दाखवले आणि नंतर लग्न मोठ्या भावाशी लावून दिले, ज्याला दारूचे व्यसन होते. लोकलाजच्या भीतीने वधू आणि तिच्या कुटुंबीयांनी हे कोणालाही सांगितले नाही. पण हद्द तेव्हा झाली जेव्हा सासूने लग्नानंतर असा अत्याचार करणे सुरू केला ज्याची कोणाला कल्पनाही कोणीच करणार नाही.

सूनेच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर सासूने तिला तिच्या चार मुलांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. आपल्या पतीशिवाय इतर कोणाशीही संबंध ठेवण्यास नकार दिल्यास सूनेला मारहाण करण्यात आली. यानंतर तिला ब्लॅकमेल करून चारही मुलांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अत्याचारातून सुटका करत कशी तरी महिला आपल्या माहेरी पळून आली.

वधूने केलेल्या आरोपानुसार तिचे दोघे मोठे दीर विवाहित आहेत तर एक धाकटा दीर आहे. सासू त्यांना एकानंतर एक खोलीत पाठवत होती आणि त्यांना संबंध ठेवण्यास भाग पाडले. विरोध केला तर तिला मारहाण केली जात होती. वधूने सांगितले, की एकदा तिला अशी मारहाण करण्यात आली, की त्यात तिचे संपूर्ण कपडेसुद्धा फाटले, त्यानंतर सासरच्या लोकांनी आईवडिलांकडे बाईक विकत घेण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यास सुरवात केली.

सध्या गाझियाबादमधील सिहानी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. वधूच्या तक्रारीनंतर सिहानी गेट पोलिस ठाण्यात महिलेच्या पती आणि सासूसह 6 जणांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here