बिहारमध्ये एकाच बाईकवर बसले सातजण; ड्यूटीवरील पोलिसाने जोडले हात

bihar-bike

चंपारण (बिहार) – एका बाइकवर दोन किंवा तीन जण बसलेले पाहणे भारतात तसे नवीन नाही. पण बिहारमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एकाच दुचाकीवर तब्बल सात जण बसले असल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एका दुचाकीवर जवळजवळ सात लोक दिसच आहेत (एक पुरुष, एक महिला आणि पाच मुले). हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. एवढेच नाही तर या लोकांकडे बरंच सामान देखील आहे. दरम्यान, एवढ्या लोकांसह बाइक चालविणाऱ्या दुचाकीस्वाराला जेव्हा एका पोलिसाने पाहिलं तेव्हा त्याने तात्काळ दुचाकीस्वारासमोर येत त्याची बाइक थांबवली आणि थेट त्याला हातच जोडले. दरम्यान, या पोलिसाने दुचाकीस्वारला चांगलेच सुनावले देखील तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याची सूचना देखील केली. त्याचवेळी चौकात उभे असलेल्या एका युवकाने मोबाईलवरून हा फोटा काढला. जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

दुचाकीवरून निघालेल्या सात लोकांपैकी तीन मुले दुचाकीच्या पुढील भागात बसली होती. यानंतर या मुलांचे वडील आणि नंतर एक मुलगा. यानंतर आई आणि एक लहान मुल जे तिच्या मांडीच्या मागील बाजूस बसले होते. हा फोटो बिहारमधील पूर्व चंपारण येथील ढाका या गावातील आहे. हा फोटो समोर येताच अनेकांनी तो सोशल मीडियावर शेअर केला आहेत. यावरुन अनेक मिम्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here