लखनऊ (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला १३ महिने एका रूममध्ये बंदी करून तिच्यावर अनेक वेळा लौगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर या लोकांनी यानंतर तिला दुसऱ्या राज्यात विकण्याचा ही प्रयत्न केला. याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी गुरुवारी (दि.१४) रोजी चार जणांना अटक केली.
लखनऊ येथे एका अल्पवयीन मुलीला मुख्य आरोपी उप्रेता कुमारने बंदी करून एका रूममध्ये ठेवले होते. यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर त्याने वेगवेगळ्या लोकांकडे त्या मुलीला घरकामांसाठी ठेवले. तेथील लोकांकडून या आरोपीने जादा पैसे घेवून या मुलीला विकत होता. तो १५ दिवसांसाठी वेगवेगळ्या घरमालाकाकडे तिला कामाला ठेवत होता. याशिवाय तो काही लोकांकडे तिला घेवून जावून ज्यादा पैशाला विकायचा. यामुळे अल्पवयीन मुलगी ५ महिन्याची गर्भवती झाली. याशिवाय हा आरोपी तिला खाण्यासही वेळेवर देत नव्हता. यामुळे तिची प्रकृती नाजूक आहे. या घटनेत आरोपीसह त्याच्या अनेक साथीदारांचा समावेश आहे.
यानंतर आरोपीने त्या मुलीला दुसऱ्या राज्यात विकण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान लखनऊ पोलिसांनी आरोपी उप्रेता कुमारसह त्याच्या साथीदारांना अटक केली. या घटनेत सध्या ४ आरोपींना अटक झाली आहे. पोलिसांनी या घटनेत अजून काही लोकांचा सहभाग असल्याची शक्यता दर्शविली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. तसेच या घटनेतील अल्पवयीन मुलीला पोलिसांनी तेथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.







