नवी दिल्लीत अल्पवयीन मुलाचं लिंग परिवर्तन करून केला सामूहिक बलात्कार

rape-on-boy

नवी दिल्ली – एका अल्पवयीन मुलाचं जबरदस्तीने लिंग परिवर्तन करून त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना नवी दिल्लीत घडली आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 3 वर्षांपूर्वी या मुलाची भेट यातील एका आरोपीशी झाली होती. एका नृत्याच्या कार्यक्रमात आरोपीने पीडित मुलाला पाहिलं होतं आणि त्याच्याशी मैत्री करून त्याला नाच शिकवण्याच्या बहाण्याने मंडावली येथे नेण्यात आलं.

तिथे त्याच्यासोबत अन्य काही जणही राहत होते. तिथे राहताना मुलाला अंमली पदार्थ देण्यात आले आणि जबरदस्तीने त्याचं लिंग परिवर्तन करण्यात आलं. त्यानंतर सतत तीन वर्षं त्याच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात येत होता. त्याला जबरदस्तीने भीकही मागायला भाग पाडलं गेलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here