स्वस्त अंतर्वस्त्र देतो म्हणून महिलांचे अंतर्वस्त्रातले फोटो मागवून ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

blackmailer

अहमदाबाद (गुजराथ) – सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या कृप्त्या वापरत आहेत. अशीच एक घटना गुजरातच्या चांदखेडामध्ये उघडकीस आली आहे. आतले कपडे स्वस्तात देतो, असे सांगत आरोपी महिलांकडून त्यांचे अंतर्वस्त्रातले फोटो मागवायचा. त्यानंतर त्या फोटोद्वारे त्यांना ब्लकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळत होता. गुजरातच्या सायबर क्राईम विभागाने आरोपीला अटक केली आहे.

एका व्यक्तीने आपल्याला फोन करून आपले अंतर्वस्त्रातले फोटो मागितले, तुम्ही फोटो पाठवल्यावर आपण आतले कपडे तुम्हाला स्वस्तात देतो, असे त्याने आपल्याला सांगितले. अशी तक्रार सायबर क्राईम विभागाकडे मंगळवारी दाखल करण्यात आली होती. नरोडामधील 19 वर्षांच्या महिलेने ही तक्रार दाखल केली होती. आपण फोटो पाठवल्यावर आपल्याला ब्लॅकमेल करण्यात आले, असेही तक्रारीत म्हटले होते.

ही तक्रार मिळाल्यानंतर सायबर क्राइम सेलने तपास करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी सूरज गवळे (वय 25) या चांदखेडा येथील सुदामा पार्कमध्ये राहणाऱ्या आरोपीला सायबर क्राइम विभागाने अटक केली आहे. गवळे हा वाणिज्य शाखेतील पदवीधर असून त्याला ऑनलाईन व्यवसाय आणि ऑनलाइन जाहिरातीचे चांगले ज्ञान असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here