समस्या सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेवर मांत्रिकाने केला सतत १० दिवस बलात्कार

tatrik-rape-on-lady

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमध्ये एका मांत्रिकाने एका महिलेवर 10 दिवस बलात्कार केला आहे. एक विवाहित महिला आपल्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी या मांत्रिकाकडे गेली होती. तेव्हा या मांत्रिकाने तिला 10 दिवस डांबून तिच्यावर अत्याचार केले.

राजस्थानमध्ये एक महिला आपल्या आयुष्याच्या समस्या घेऊन एका मांत्रिकाकडे गेली होती. त्यावर मांत्रिकाने तिला सर्व समस्यांवर उपाय असल्याचे सांगितले. नंतर तिला खाण्याच्या माध्यमातून बेशुद्धीचे औषध दिले.

महिला जेव्हा बेशुद्ध झाली तेव्हा या मांत्रिकाने तिचे अपहरण केले आणि बंगळुरूला घेऊन गेला. तिला डांबून 10 दिवस तिच्यावर बलात्कार केला. या मांत्रिकाच्या तावडीतून कशीबशी सुटून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here