नाशिक (विशेष प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील मोतीनगर भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील दोन महिलांनी केटरिंगच्या कामासाठी बोलावून इंदौरेला 1 लाख 20 हजार रुपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आज गुन्हा दाखल आला आहे. याप्रकरणी मालेगाव येथील पीडितेच्या पतीने श्रीरामपूर शहर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी अनिता रविंद्र कदम ( रा. आंबेडकर वसाहत, दत्तनगर, श्रीरामपूर ) व अनिताची मैत्रिण संगिता (पूर्ण नाव माहीत नाही, रा. संभाजीनगर) या दोघींविरुद्ध भादवि कलम 366, 370, 370, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी पत्नीला केटरिंगच्या कामासाठी आमच्याकडे पाठवून द्या. योग्य पगार मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर दोघींनी तिला मध्य प्रदेशातील इंदौर येथे नेले. त्या ठिकाणच्या अज्ञात व्यक्तीकडून 1 लाख 20 हजार रुपये घेवून तिला त्या इसमाच्या ताब्यात दिले. त्याप्रकरणी भापोसे आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर धायवड तपास करीत आहेत.







