अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना, शिरूर अनंतपाळ येथे तणावाचे वातावरण

shirur-anantpal

शिरूर अनंतपाळ – तालुक्यातील साकोळ येथे रविवारी 17 जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरूने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास दगडफेक करून विटंबना केली. तसेच शहरातील पथदिवे, लोकांना बसण्यासाठी लावण्यात आलेल्या आसनांची तोडफोड केली. यामुळे गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना या दोन्ही गोष्टींमुळे गावात तणाव निर्माण होऊ नये यासाठी समस्त गावकऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आला. चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे व शिरूर अनंतपाळचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तेथे पोलीस बंदोबस्त केला.

या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. गावातील वातावरण शांत ठेवावे असे आवाहन करत लवकरात लवकर आरोपीचा शोध घेतला जाईल, असे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here