‘गेट-टुगेदर’साठी निघालेल्या महिला डॉक्टरांवर काळाचा घाला; 11 प्रवाशांचा मृत्यू

davngiri-lady-doctors

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कर्नाटकमध्ये शुक्रवारी एका भीषण अपघातात 11 प्रवासी मृत्युमुखी पडले, तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये 9 महिलांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

doctor's-last-selfiकर्नाटकमधील काही रहिवासी मिनी-बसमधून गोव्याला निघाले होते. त्यावेळी धारवाड शहरालगत त्यांच्या मिनी-बसची समोरून आलेल्या टिपरशी जोरदार धडक झाली. दावणगिरी येथील डॉक्टर्स महिला मंडळाचा 16 डॉक्टरांचा चमू एका कार्यक्रमासाठी गोव्याला जात होता,यातील बहुतांश महिला डॉक्टर्स या स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचे समजते.

davangiri-accidentअपघातानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्यामध्ये स्थानिकही सहभागी झाले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मृतांमध्ये मिनी-बसच्या चालकाचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here