खुलताबाद पोलीस ठाण्याकडून सर्व नागरिकांना आवाहन

psi-sitaram-mehetre

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – नुकतीच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक सन २०२०/२१ अनुषंगाने दि. १८/०१/२०२१ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर आपण निवडणूक संदर्भाने लागू असलेल्या आचार संहितेचे पालन करणे बंधनकारक आहे.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी औरंगाबाद यांचे जमाव बंदी व शस्त्र बंदी आदेश लागू असून आपण किंवा आपल्या अनुयायी/कार्यकर्ते एकत्र येऊन घोषणाबाजी करणार नाही व एकत्र येऊन जमाव जमवून कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करणार नाही.कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक व जातीय भावना दुखावतील असे कृत्य व भाष्य करू नये.

कोरोना आजाराचे प्रादुर्भावामुळे एकत्र येण्यास व मिरवणूक काढण्यास मनाई आहे.पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.निकालाच्या दिवशी विजय/पराभव झाल्यास तो शांततेच्या मार्गाने स्वीकारून आपणाकडून अथवा आपल्या समर्थकांकडून सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच फटाके वाजवू नये तसेच गुलाल उधळवू नये, कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त बॅनर किंवा होर्डिंग्ज लावू नयेत,कोणत्याही प्रकारच्या विजयी सभा किंवा मिरवणुका आयोजित करू नयेत, सोशल मीडियाचा वापर करून कोणतेही आक्षेपार्ह विधान किंवा संदेश प्रसारित करू नये, कोणतेही जेवण, भंडारे किंवा आनंद जल्लोषाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत. असे आवाहन खुलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here