ग्रा.पं. निकाल : खुलताबाद तालुक्यातील मतमोजणीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण

khultabad-election-training

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न,काही तासात होईल निकाल घोषित.

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – म्हैसमाळ रोड येथील डॉ.जाकिर हुसैन शिक्षण महाविद्यालयच्या मल्टीपर्पस सभागृहात आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.व अवघ्या दोन तीन तासातच 25 ग्रामपंचायतींचे निकाल जाहिर होईल.असी माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली.मतमोजणीसाठी
निवडणूक अधिकारी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी डॉ.जाकिर हुसैन शिक्षण महाविद्यालयच्या मल्टीपर्पस सभागृहात मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग पार पडला.यात 73 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.रविवार रोजी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

मतमोजणी प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी संगिता सानप व तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीसाठी 14 टेबलवर सहा फेरीद्वारे होणार असून त्यासाठी 14 पर्यवेक्षक,2 रो ऑफिसर,13 निवडणूक निर्णय अधिकारी, 13 सहायक निवडणुक निर्णय अधिकारी,4 नोडल अधिकारी,8 मास्टर ट्रेनर,5 संगणक परिचालक ,14 मतमोजणी सहायक,टेबलनिहाय शिपाई/कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

khultabad-electयाकामी नायब तहसीलदार अशोक कापसे, पी.बी.गवळी,उदय मानवतकर, सतिश देशमुख, विनोद जाधव, विनेश महेर, कुमारकन्हैया वैष्णव,मंडळ अधिकारी सोनवणे,गवळी ,कुरुंद,तलाठी सचिन भिंगारे,डी.पी.गोरे, भगवान घुसळे, विलास वाहुळ आदी परिश्रम घेत आहे.

दरम्यान सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे.कारण निकालानंतर आरक्षण सोडत निघणार असून त्या नंतर खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापणार आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या एकूण 241 जागांपैकी 36 बिनविरोध निवड झाल्याने 205 सदस्य पदांसाठी 474 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.आता 474 उमेदवारांचे भावितव्याचा फैसला आज ठरणार आहे. शुक्रवारी 84.33% मतदान झाले आहे.बंपर मतदान झाल्याने आता मात्र कोणते उमेदवार बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here