पार्किंगच्या वादातून बँक व्यवस्थापकाला मारहाण

marhan

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पार्किंगच्या वादातून बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाला धक्काबुक्की केली असून बँकेच्या कर्मचार्‍याला मारहाण करत त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पारेख, भुषण पटील, बिराजदार आणि एका सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमोह रोशन, मुद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी श्रीवास्तव हे बँकेचे व्यवस्थापक असून त्यांच्या आणि अरिहंत कॉलेजच्या कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार पार्किंगच्या वादातून भांडणे होत असतात. याच कारणावरून शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पुन्हा वाद झाल्याने श्रीवास्तव यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच बँकेचे कर्मचारी पांडुरंग गिड्डे यांना हाताने मारहाण करून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here