बाॅयफ्रेंडसोबत बोलण्यास नकार दिल्याने मुलीनं केला वडिलांची खून

girl-killed-her-father

भोपाळ (मध्यप्रदेश) – बाॅयफ्रेंडसोबत मोबाईलवर बोलण्यास नकार दिल्याने मित्रांच्या मदतीने दत्तक मुलीने वडलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीरम हुरमाडे असे मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना बैतूल येथील सारणी भागात घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी दत्तक मुलीसह चार आरोपींना अकट केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, बाॅयफ्रेंडसोबत मोबाईलवर बोलण्यास, फिरायला जाण्यास नकार दिल्याने दत्तक मुलीने बाॅयफ्रेंड आणि मित्रांच्या मदतीने वडलांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कपड्यात गुंडाळून घरामागील झोपडीत लपवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी बबलू नागले यांनी माहिती दिली की, बहिनीचे पती श्रीराम हुरमाडे आणि त्यांची दत्तक मुलगी सुभाष नगर मध्ये राहतात. श्रीराम यांच्यासोबत त्यांचे 12 जानेवारी नंतर बोलणे झाले नाही. 14 जानेवारीला मोहल्ल्यातील लोकांकडून समजले की, श्रीरम हुरमाडे यांच्या घराच्या पाठीमागील झोपडीतून दुर्गंधी येत आहे.

त्यांची मुलगी पाहण्यासाठी जावू देत नाही. तेव्हा बबलू श्रीराम यांच्या घरी गेले त्यांनी दरवाजा उघडून झोपडीत पाहिले असता श्रीराम यांचा मृतदेह कापडात गुंडाळून ठेवल्याचे दिसले. त्यांच्या डोक्यावर मार लागल्याचे तसेच गळा चिरल्याचे दिसले.

यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृत श्रीराम हे आपल्या मुलीला बाॅयफ्रेंड आणि मित्रांसोबत फिरण्यास आणि मोबाईलवर बोलण्यास मनाई करत असत. याचा राग आल्याने मुलीने बाॅयफ्रेंड आणि मित्रांच्या मदतीने प्लॅन करून वडिलांचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

पोलीस अधिकारी महेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, मृतदेह घराच्या पाठीमागील झोपडीत लपवला होता आणि दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यावर परफ्यूम टाकला. या हत्या प्रकरणात दत्तक मुलगी मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दत्तक मुलीसह चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here