आवाज का सरताज बादशहा ज्यूनियर अमीन सायानी रतनकुमार थोरात

    amin-sayani

    (शब्दांकन-हेमकांत सोनार)
    “जी.. हाँ ..बहनो ओर भाईयों !”
    “आवाज.. कि दुनिया के दोस्तो”
    “अगले.. पायदान पर …ये गाना…है….! ”
    “मैं आप का दोस्त अमीन सायानी बोल रहा हूँ |”
    हे जादुई शब्द कानावर पडताच क्षणी रेडिओ सिलोनच्या कोणत्याही चाहत्याला ‘ बिनाका गीतमाला’चे युग आठवते. आणि तो आवाज कानात घुमायला लागतो .
    या जादूई आवाजाचे हे शब्द जरी कानावर पडले कि आठवण होते “बिनाका गीत माला “आणि आवाजाचा सरताज बादशहा अमीन सायानी यांची.
    रेडिओ सिलोन वर ३ डिसेंबर१९५२ला “बिनाका गीतमाला”ची सुरुवात झाली . दर बुधवारी आठ वाजता अमिन सायानी यांच्या आवाजात “बिनाका गीत माला” कार्यक्रमप्रेमी रेडिओ सिलोनवर ऐकण्यासाठी पूर्ण दुनिया उत्सुक असे.त्या काळी रेडिओ प्रेमींना हाच मनोरंजनासाठी एकमेव पर्याय होता. अमीन सायानी यांच्या आवाजाने प्रेरित होऊन एक अवलियाने “बिनाका गीत माला” कार्यक्रम ऐकता ऐकता स्वतः वयाच्या १५ व्या वर्षी हातात माईक घेऊन आपल्या सुमधुर आवाजात अमिन सायानी यांचा जसाचा तसा आवाज काढायला सुरुवात धुळे शहरातून केली. आदल्या दिवशी बिनाका गीतमाला ऐकायचा दुसऱ्या दिवशी तशीच्या तशी अनौन्समेंट करून रेकॉर्ड वाजविणे हा जणू छंदच. मनाची ईच्छाशक्ती जर मजबूत असेल तर माणूस उंच शिखर गाठू शकतो. असेच एक उंच शिखर गाठलेले गेली ४८वर्षापासून अमिन सायानी यांची प्रेरणा घेऊन आवाजाचा बादशहा ज्यू.अमिन सायानी म्हणून ओळख असलेले जळगाव चे रतनकुमार थोरात आज ६५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आज त्यांनी त्यांच्या मागील ६४ वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. वाढदिवसाच्या निमित्ताने रतनकुमार थोरात यांनी मागील आठवणींना उजाळा दिला यावेळी म्हणाले की, “मेरी आवाज ही मेरी पहचान है!”

    जळगाव सुभाष चौकातील दहीहंडीअसो ,मुख्यमंत्री कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, संमेलन, जळगाव महोत्सव,वाढदिवस, वधूवर परिचय मेळावा तसेच आँकेस्ट्रा , लग्न समारंभ ,विविध कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि रतनकुमार थोरात यांची कार्यक्रम प्रसंगी अनांऊसिंन हे समिकरण जुळले आहे, आपल्या जादूई आवाजाने प्रेषकवर्गाला मंत्रमुग्ध केले.

    आवाजाची जादूई कमाल:–
    लाऊडस्पीकर रेकॉर्डवर गाणे ऐकायच्या आधी माईकवर अमिन सयानींच्या आवाजात “बिनाका गीत माला “ची अनांऊसिंन करायची.ही लहानपणापासून ची सवय! यामुळे रस्त्याने जाणारा प्रेषकवर्ग थांबून जादूई आवाज ऐकून हा ” बिनाका गीत माला” चा कार्यक्रम आहे का? असा प्रश्न विचारत असे. पण ही जादूई आवाजाची किमया होती ज्यू.अमिन सायानी रतनकुमार थोरात (जळगाव)यांची.

    रतनकुमार थोरात यांनी मागील आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी सांगितले कि, १९७५ साली उंटबिडी, सिन्नर बिडीची जाहिराती करू लागलो. त्यावेळी लोक गावोगावी ,शहरातून आवाज ऐकण्यासाठी गाडी भोवती गर्दी करायचे. इतर कंपनीचे मालक देखील अमीन सायानी यांचा आवाज ऐकून स्वतः प्रेरित होऊन माझ्या कंपनीच्या जाहिरातीसाठी काम कराल का?अशी विचारणा करायचे. यात्रांमध्ये कंपनीच्या मालाची जाहिरात आपल्या जादूई आवाजाने कमाल करून दाखवायचे यामध्ये शोले,त्रिशूल फिल्मचे डाँयलाँग, गब्बरसिंग,कलाकारांचे (हिरो) आवाज, मिमिक्री इ.आवाज काढून प्रेषकवर्गाचे मनोरंजन तर व्हायचे सोबत मालाची/दुकानाची जाहिराती वेगवेगळ्या परिसरात व्हायची.त्यावेळी मालकाने आवाजावर प्रभावित होऊन कंपनी जाहिरात प्रचारक म्हणून ३४०रु.महिना पगारावर दोन वर्षे नोकरी दिली.
    आवाजाची परमेश्वर देणगी असल्यामुळे धुळ्यातच सिनेमा, कापड दुकान, इ. टांगा,रिक्षावर जाहिराती करु लागलो. “त्रिशल” सिनेमा धुळ्यात नटराज थिएटरच्या चित्रपटगृहात रिलीज झाला. त्याची रिक्षाव्दारे जाहिरात करीत असतांनाच अमरावतीचे त्रिशूल चित्रपटाचे एजंट श्री पुरोहित यांना १९७८साली जी.के. स्टुडिओ साठी आवाजाची एक झलक ऐकवली..आणि माझ्या आवाजावर मोहित होऊन त्या बँनरखाली जाहिरातीसाठी काम मिळाले.हा जीवनाचा सर्वात मोठा अनुभव होता.सलूनच्या दुकानापासून ते चहाच्या हाँटेलात आवाजाची एकच चर्चा ! त्यावेळी मासिक मानधन दोन हजार रुपये मिळत असे. नंतर आपण आपलं स्वतःच वेगळे स्थान असावं यासाठी वडिलांकडे गार्हाणे मांडून जूना सेकंडहँण्ड रु.१३०० लाऊडस्पीकर घेऊन वडिलांनी माझा हट्ट पुरविला. धुळ्यात वेगवेगळ्या दुकानाच्या जाहिराती करू लागले.

    junior-amin-sayaniजादूई आवाजाने उंच शिखर गाठले:–
    १९८०साली जळगाव येथे आलो. सुरेशदादा जैन.. नावाचे राजकीय वादळ नुकतेच राजकारणात उतरले होते. यासाठी दादांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी धुळ्याहून बोलवून घेतले. त्या वेळेस संपूर्ण जळगाव शहर अमिन सायानी मय करून टाकले. आणि सुरेश दादा प्रचंड मताधिक्याने निवडून आले. बाबीसी वृतवाहिनीवर बातमी आली. लोक ज्यूनियर अमिन सयानी नावाने ओळखू लागले. सुरेश दादा आमदार झाल्यावर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बँ.ए.आर. अंतुले साहेब यांच्या निवडणूक प्रचारासाठी रतनकुमार यांना कोकणात श्रीवर्धन आंबेत ला पाठविले. अंतुले साहेब निवडून आले. पण आवाजाची जादूई किमयाने हा परिसर गाजवला. जळगावात सर्व प्रकारच्या जाहिराती साठी अमिन सायानी यांच्या आवाजात होत होत्या. आँकेस्ट्रा,विविध कार्यक्रमांचे, सुत्रसंचालनासाठी बोलावणे येऊ लागले.१९८१ते१९९०हे दशक आकाशवाणी जळगावचे कार्यक्रमांना प्रथम श्रेणी मिळवून रेडिओ विज्ञापणासाठी जवळपास ९०%जाहिराती रतनकुमार थोरात यांच्या आवाजात असायच्या. त्यावेळीच्या माझ्या आवाजातील जाहिराती म्हणजे ‘ बाबुभाई कलेक्शन, टिळक रोड नाशिक !
    ” आकाशदिप जमनालाल बजाज रोड धुळे!”
    ” विजय कलेक्शन, आग्रारोड धुळे!” “सुरेश कलेक्शन जळगाव! ” “सुगनचंद के. राका अँण्ड कं.जळगाव”
    इ.विविध प्रकारच्या जाहिराती आकाशवाणी तसेच लाऊडस्पीकर माध्यमातून प्रचार होत असे. काही दिवस आ.सुरेशदादा जैन यांनी १९८२-८४साली खान्देश मील जळगाव येथे नोकरीला लावले.पण कालांतराने ती ही बंद पडली. पुन्हा लाऊडस्पीकर.. रिक्षा.. प्रचार नशिबी आलाच..! नंतर वखार महामंडळात विविध पदावर नोकरी केली. नोकरी करीत असतांना पुढील शिक्षण चालू ठेवले आणि यशाचा पल्ला गाठत गेले. सेवानिवृत्ती नंतर आजही आँकेस्ट्रा सुत्रसंचालन , जाहिराती, लग्नाचे धावते वर्णन , तसेच “सा-रे-गा-मा कराओके “आँकेस्ट्रा सुरू केला आहे. रतनकुमार थोरात हे आजही “बिनाका गीतमाला “फेम अमीन सायानी यांना प्रेरणास्रोत गुरू स्थानी मानतात. म्हणूनच ज्यूनियर अमिन सायानी या नावाने ओळख निर्माण झाली.

    स्वप्नपूर्ती ईच्छा पुर्ण:–
    २५ मे२०१९रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड पुणे येथे सभागृह पूर्णपणे खचाखच भरला होता.कार्यक्रम स्थळी गर्दी असल्याने बाहेर स्क्रीन ची व्यवस्था करावी लागली. हा कार्यक्रम म्हणजे गुरू शिष्याचे मनोमिलन. साक्षात अमिन सयानी …! म्हणजे देव समोर असणे..! तो दिवस कधीही विसरता येणार नाही. अमिन सायानी यांनी पाठीवरून हात फिरविला… आणि ..धन्य झालो. आयुष्याचे सार्थक झाले.आयोजकांनी त्यांचा सत्कार केला.. आणि उपस्थित प्रेषक रसिकांनी माझी खूप वाहवा केली. मी धन्य झालो. माझे आयुष्याचे मेहनतीचे स्वप्न पुर्ण झाले. ही आठवण आयुष्यभर स्मरणात राहील.अशाप्रकारे माझा आवाज हा ईश्वरी शक्ती जरी असला तो माझा प्राण आहे. कार्यक्रम केल्याने मला एक ऊर्जा मिळते आणि अमिन सयानी माझे प्रेरणा स्त्रोत आहे. असे यावेळी सांगितले.

    वाढदिवसाला आईवडिलांची आठवण:- –
    यावेळी अगदी भाऊक होऊन सांगितले कि, आईचे छत्र लहानपणी हरवले पण आपल्या सामाजिक जीवनात वडिलांनी ” आई ” या शब्दाची कधीही आठवण येऊ दिली नाही. माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून प्रत्येक वेळी मदतीच्या रुपाने दिलेला आशीर्वाद पाठबळ यामुळे माझे जीवन सार्थक झाले. आज ते (माझ्या वाढदिवशी )हयात असते तर नक्कीच मायेने पाठीवर हात फिरवत आशीर्वाद दिला असता. लहानपणी सेकंडहँण्ड घेऊन दिलेला “लाऊडस्पीकरची कमाल ” ने उंच शिखर गाठलेले पाहून नक्कीच आज त्यांची आठवण होते. यात वडील बंधू-वहिनी ,परिवार यांचा प्रेम,आशीर्वाद तर होताच.
    लग्न झाल्यानंतर प्रत्येक वेळी माझी पत्नी(सौ.आशाताई)यांनी अत्यंत बिकट परिस्थितीप्रसंगी पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहून मोलाचे सहकार्य /योगदान आहे.हे मी कधीही विसरू शकत नाही. यामध्ये मुलांचे/सुनांचे,नातवांचे प्रेम सहकार्य तसेच नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट इ.मोलाचे सहकार्य आहे.आज या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
    ” माझा आवाज हिच माझी प्रेरणा आणि ओळख आहे”!
    यामुळेच मी यशाचे उंच शिखर गाठू शकलो.असे याप्रसंगी सांगितले.
    अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा…..!
    कुछ सोचने कि तुमको नजर दे के जाऊंगा…….!
    यारो मैं इस जमाने का संगतराश हूँ…..!
    पत्थर को बोलने का हुन्नर दे के जाऊंगा….!

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here