मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मिरा भाईंदर शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. चंद्रकांत द. भोसले यांची भाईंदर पोलीस स्टेशन पश्चिम येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या मिरा भाईंदर शहराचे अध्यक्ष सलीम अब्बास खान, महासचिव विश्वनाथ तायडे, प्रवक्ता महेंद्र शां. चाफे, कोषाध्यक्ष सुमित जामनिक, सचिव बाबू इंगळे,महिला आघाडी उपाध्यक्ष मीना सोरटे आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती मिरा भाईंदर शहर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता महेंद्र शांताराम चाफे यांनी दिली.







