अठराविश्वे दारिदय्र पदरी, तरीबी आदर्श माता झाली शेवराई भोसले

tejasvi-zep-purskar

पुणे (प्रतिनीधी.सुनील भोसले) – गरीबीने छळलं, परिस्थितीतीने पळवले, जात पारधी म्हणून पोलिसांनी बडवलं. पारधी समाजाताली असल्याने गुन्हेगारीचा कलंक पुसतांना मुलांचे शिक्षण अर्धवट राहिले. अठराविश्वे दारिद्रयात जगताना दहा मुले झाली, त्यातील तीन मुले मनोरुग्ण, एक मुलगी नेत्रहीन, थोरली वारली, चार मुलं चांगले आहेत, त्यातील दोन शाळेत शिपाई, एक पत्रकार झाला आणि माझा नामदेव मी समाजसेवेसाठी व देशसेवेसाठी सोडला. आज माझा नामू स्वतः उपाशी राहतो परंतु हजारो गरीब दुःखी लोकांचे निःस्वार्थपणे दुःख कमी करून आसू पुसतो, यातच मला सर्व काही मिळाले. लाखात एक पोरगा माझ्या पोटी नामदेवच्या रुपातून हिरा जन्माला आला, असे मत तेजस्विनी झेप या कार्यक्रमात जिजामाता पुरस्काराने सन्मानीत आदर्शमाता शेवराबाई भोसले बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, जे माझ्या कुटुंबाला गरिबीमुळे भोगावं लागले ते हाल देशातील कोणत्याही गरीब कुटुंबातील लोकांनी भोगू नये म्हणून मी मुलांना शिकवलं, पैसेविना जगा, माणसाला माणूस जोडा, या देशात सुखशांती पसरून देश एक करण्याचा प्रयत्न करा ही शिकवण दिली. तसे देशातील प्रत्येक नागरिकानी असंच करावं असं मला वाटते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आरती सोनोग्रा म्हणाल्या की, साऱ्या विश्वाचे दुःख आपल्या मायेच्या पदरात सामावून घेणाऱ्या मायी शेवराईचा सन्मान करताना आमचे हात थरथरत आहेत. आई शेवराईचे योगदान या देशासमोर आदर्शच असणारे आहे.

यावेळी आरती सोनोग्रा, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले, डीवायएसपी नम्रता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा, रुपाली चाकणकर, सौ सोनल चेतन तुपे,डॉ निलम डावरे, पुजाताई प्रदिप कंद, राजेश्री कड, साहित्यिक,व या कारेक्रमाचे आयोजक राजकुमार काळभोर, पत्रकार सुनिल भोसले,वतेजस्वनी संस्था, व मधुमालती फाऊंडेशन तेजस्विनीची तेजस्वी झेप पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगीता पाखले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here