दिल्लीतील हॉटेलमधून सीबीआयने जप्त केली 2 कोटींची रोकड

2-core-rupees
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – सीबीआयने दक्षिण दिल्लीतील हॉटेलमधून तब्बल 2 कोटी रूपयांची रोकड जप्त केली. रेल्वे अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याच्या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ती रोकड दडवून ठेवली होती.

लाचखोरीशी निगडीत मोठ्या घटनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या संबंधित प्रकरणाच्या तपासाला सीबीआयने वेग दिला आहे. त्यातून गुवाहाटीस्थित एबीसीआय इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि. या कंपनीच्या विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. असाच एक छापा दिल्लीत टाकण्यात आला. त्यावेळी दिल्लीतील इतर ठिकाणी काही ऐवज दडवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याआधारे सीबीआयने एका हॉटेलची तपासणी करून रोकड हस्तगत केली.

संबंधित प्रकरणात आतापर्यंत 4 कोटी 43 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एबीसीआय इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीने कंत्राटे मिळवण्यासाठी नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या (एनएफआर) वरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. त्यावरून एनएफआरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एम.एस.चौहान आणि इतर काही अधिकाऱ्यांना याआधीच अटक करण्यात आली. सीबीआयने याआधी केलेल्या जप्तीमध्ये लाचेच्या रकमेचाही समावेश असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here