ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिला म्हणून तलवारीने मारहाण

talwar-marhan

पारनेर – तालुक्यातील कुरुंद येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिला, याचा राग धरून 11 जणांनी काठ्या तलवारीसह एकास बेदम मारहाण केली. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जयवंत मंजाबा नरवडे (रा. नरवडेवस्ती, कुरुंद, ता. पारनेर) हे अनिल दशरथ कर्डिले याच्याविरोधात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे राहिले होते. त्याचा मनात राग धरून कर्डिले याने गैरकायद्याची मंडळी जमवून जयवंत नरवडे यांना तलवार, काठीने डोक्यात, हातावर, पायावर मारहाण करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नरवडे यांची सून भांडण सोडविण्यास गेली असता, अविनाश नीलेश कर्डिले याने त्याच्या कंबरेचे पिस्तूल काढून डोक्याला लावून धमकी दिली.

याबाबत जयवंत नरवडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून अनिल दशरथ कर्डिले, अमोल भाऊसाहेब कर्डिले, सागर भाऊसाहेब कर्डिले, विवेक अरुण कर्डिले, अविनाश नीलेश कर्डिले, राजू शेळके, राजेंद्र साहेबराव कर्डिले, पंकज अनिल कर्डिले, सुहास थोरात, आकाश नीलेश कर्डिले, रमेश महादू नरवडे (सर्व रा. कुरुंद, ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आकाश नीलेश कर्डिले, रमेश महादू नरवडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here